breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

माथेफिरू व्यक्तीनं पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर दुचाकी घातली

ठाणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी सर्वत्र नाकाबंदी सुरू आहे. पण वसईत नाकाबंदी सुरू असताना एका माथेफिरू व्यक्तीनं पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर दुचाकी घातली असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर वसईच्या आयसीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

सनील पाटील असे जखमी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. वसई पूर्व एव्हरशाईन सर्कल येथे आज सकाळी ११च्या सुमारास ही घटना घडली आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखता यावी, याकरिता पोलीस रस्त्यांवर बंदोबस्तासाठी तैनात आहेत. मात्र, अशा प्रकारच्या घटनांनी पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button