breaking-newsराष्ट्रिय
#AmphanCyclone:पंतप्रधानांकडून पश्चिम बंगालसाठी 1000 कोटींची मदत जाहीर
कोलकाता : पश्चिम बंगाल आणि ओदिशा येथे अम्फान चक्रीवादळाने अतोनात नुकसान केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे नुकसान पाहणी दौरा केला. या चक्रीवादळाने पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये मोठं नुकसान केलं आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालला तात्काळ एक हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली.
त्याशिवाय, अम्फान चक्रीवादळामुळे जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमी झालेल्यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत केंद्र सरकार करेल, असंही पंतप्रधानांनी जाहीर केलं.