breaking-newsआंतरराष्टीय

इजिप्तमध्ये यू ट्यूबवर एक महिन्याची बंदी-सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

कैरो (इजिप्त) – इजिप्तच्या सर्वोच्च न्यायालयने यू ट्यूब या वेबसाईटवर एका महिन्यासाठी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या संबंधातील एक वर्षभर प्रलंबित असलेल्या खटल्याचा निकाल जाहीर करताना सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी लागू केली आहे. मोहम्मद पैगंबर यांची बेअदबी करणाऱ्या एका फिल्मबाबत यू ट्यूबच्या विरोधात हा खटला चालू होता.
य संदर्भात कनिष्ठ न्यायालयाने सन 2013 साली “इनोसन्स ऑफ मुस्लिम्स’ या व्हिडियोवर बंदी घालण्याचा आदेश वेबसाईटला दिला होता. त्याविरोधात एनटीआरए (नॅशनल टेलिकम्युनिकेशन्स रेग्युलेटरी ऑथॉरिटी) कडे अपील करण्यात आले होते. एनटीआरए ने न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.

सन 2012 च्या या चित्रपटावरून पश्‍चिम एशियात अमेरिकेविरुद्ध झालेल्या निदर्शनांत 30 पेक्षा अधिक लोक मारले गेले होते. हा चित्रपट्‌ खासगी असून त्याला सरकारचे समर्थन नाही असे स्पष्टीकरण देत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत अमेरिकेने विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

आज इजिप्तच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अंतिम असून त्याविरोधात अपील करता येणार नाही, मात्र तरीही आज दुपारी काहिरा येथे यू ट्यूबची वेबसाईट “ओपन’ होत होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button