breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
इंधन दरवाढीचा निषेध; काँग्रेस मंत्र्यांनी सायकलवरुन गाठले विधिमंडळ
![Protest against fuel price hike; Congress ministers reach the legislature by bicycle](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/evxxmtlu.jpg)
मुंबई – दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचे चटके सर्वसामान्याना सहन करावे लागत आहेत. या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी काँग्रेस मंत्री व आमदार सायकल चालवत विधानभवनात पोहोचले. मोदी सरकारने तत्काळ इंधन दरवाढ मागे घेऊन जनभावनेचा आदर करावा व जनतेची लूट थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
वाचा :-अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळ परिसरात काँग्रेस-भाजपा आमनेसामने
आजपासून विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेस नेत्यांनी सायकलवरून विधिमंडळ गाठले. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पुढाकार घेऊन सायकल चालवत पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवला. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम व अनेक आमदारांनी सायकल चालवून निषेध नोंदवला.