breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंद्रायणीनगरमधील ‘त्या’ मृतांच्या कुटुंबियांचे महापौर माई ढोरेंकडून सांत्वन

पिंपरी | प्रतिनिधी

भोसरी येथील इंद्रायणी नगर येथे झालेल्या विद्युत रोहित्राच्या स्फोटातील मृतांच्या कुटुंबियांची आज महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या कोतवालवाडी, च-होली येथील घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांचे सांत्वन केले. महापालिकेच्यावतीने आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी महापौर ढोरे यांनी या कुटुंबियांना दिले.

यावेळी माजी महापौर नगरसेवक नितीन काळजे, नगरसेविका नम्रता लोंढे, सुवर्णा बुर्डे, सामाजिक कार्यकर्ते विकास बुर्डे आदी उपस्थित होते. महापौर ढोरे यांनी इंद्रायणीनगर येथील घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली.‍ शनिवार दि. ०५ सप्टेंबर रोजी इंद्रायणीनगरमध्ये विद्युत रोहित्राचा स्फोट झाला.

या स्फोटात एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या होत्या. यामध्ये शिवन्या सचिन काकडे या ५ महिन्याच्या बालिकेसह तीची आई हर्षदा सचिन काकडे आणि आजी शारदा दिलीप कोतवाल यांचा समावेश आहे. यातील शिवन्या आणि शारदा कोतवाल यांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तर हर्षदा काकडे यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. घटनेचे गांभिर्य पाहता शहरात यापुढे अशाप्रकारच्या गंभीर घटना घडून जीवीत अथवा वित्त हानी होऊ नये यासाठी महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांनी महावितरणच्या प्रमुख अधिका-यांची तसेच महापालिका अधिका-यांची दि.८ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली आहे.FacebookTwitterPinterestWhatsApp

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button