breaking-news

नाशिक मधुन २ लाख १६ हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

नाशिक | महाईन्यूज

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मंगळवार (दि. ३) पासून दहावीची परीक्षा घेण्यात येत असून या परीक्षेला नाशिक विभागातून २ लाख १६ हजार विदयार्थी प्रविष्ठ होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील २०२ केंद्रावर ९७ हजार ९३४ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहे.परीक्षेची तयारी अंतिम टप्यात असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयाने दिली आहे.

विद्यार्थ्यांच्या कारकिर्दीला दिशा देणारी दहावीची परीक्षा अवघ्या अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने शिक्षण मंडळाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली आहे. परीक्षा तणावमुक्त आणि गैरप्रकारमुक्त पार पडावी, यासाठी विविध उपक्रम राबवले जात असून परीक्षेतील संभाव्य गैरप्रकारांवर नजर ठेवण्यासाठी जिल्हानिहाय भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मागील वर्षी नाशिक विभागातून दहावी आणि बारावी या दोन्ही परीक्षांना सर्वाधिक कॉपीची प्रकरणे समोर आली होती. या पार्श्वभूमीवर गैरमार्गाची शक्यता असलेल्या केंद्रावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button