breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

इंदिरा गांधी जयंतीनिमित्त युवक काँग्रेसचा ‘वृध्द सेवा उपक्रम’

पिंपरी / महाईन्यूज

स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने वृध्द सेवा उपक्रम आयोजित करण्यात आला. बिजलीनगर येथील संत मोनीबाबा आनंद आश्रम येथील ज्येष्ठ नागरिकांना खाद्य पदार्थ वाटप करण्यात आले.

शहर युवक काँग्रेसच्या वतीने दैनंदिन स्वंयपाकासाठी २० किलो साखर, १० किलो मैदा, १० किलो शेंगदाणे, १० किलो मसूर डाळ, ५ किलो छोले, पापड व बिस्किटांची पाकिटे असा माल देण्यात आला. याप्रसंगी वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी चर्चा केली, उपक्रमाबाबत ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.

यापूर्वी सकाळी अकरा वाजता बीआरटी रोड काळेवाडी येथील मनपा आरोग्य कार्यालयात स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमा युवक काँग्रेसच्या वतीने नरेंद्र बनसोडे यांच्या हस्ते भेट देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय जैन, शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, प्रदेश युवक काँग्रेस सचिव कौस्तुभ नवले, जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, दिपक भंडारी, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, अनिल सोनकांबळे, प्रविण जाधव व निलेश वाघमारे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button