इंदिरा गांधीच नव्हे तर करीम लालाची भेट राजीव गांधी, शरद पवार, बाळ ठाकरेही घ्यायचे
मुंबई | महाईन्यूज
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याची भेट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली होती, असा गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. राऊत यांनी आपले विधान मागे घेतलेले आहे. मात्र करीम लालाची भेट केवळ इंदिरा गांधीच नव्हे तर माजी पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनीही घेतल्याचा दावा करीम लालाचे नातू सलीम खान यांनी केलेला आहे.
संजय राऊत यांच्या वक्तव्याने गदारोळ झाल्यानंतर सलीम खान यांनी हा दावा केलेला आहे. राऊत म्हणाले होते की, करीम लाला याची भेट अनेक नेते घेत होते. इंदिरा गांधी यांनी देखील करीम लालाची भेट घेतलेली आहे. यावर सलीम खान म्हणाले की, केवळ इंदिरा गांधीच नव्हे तर राजीव गांधी, शरद पवार, बाळ ठाकरे या दिग्गज नेत्यांशी करीम लाला यांची भेट होत असे.