breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंदापुरात शरद पवारांनी उखाणा घेवून सर्वांनाच केलं आर्श्चयचकित

इंदापुर –  इंदापुर येथील शरद कृषी महोत्सवातील महिलांच्या कार्यक्रमात शरद पवारांनी उखाना घेतला. त्यांनी  ‘नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात’ असा उखाणा घेवून  सर्वांनाच आर्श्चयचकीत केले.

इंदापूर बाजार समितीच्या वतीने शरद कृषी महोत्सवाचं आयोजन केले होते. या कार्यक्रमात महिलांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी बोलताना शरद पवार यांनी कुतूहलाने उखाणा स्पर्धेबद्दल विचारणा केली. त्यावर या स्पर्धा संध्याकाळच्या सत्रात घेणार असल्याचे निवेदिकेने सांगितलं. मात्र शरद पवार यांनी मला वाटलं आमच्यासमोरच कोणीतरी उखाणा घेईल, असं वाटलं होतं असं म्हणत या निवेदिकेलाच उखाणा घ्यायला सांगितला. त्यानिवेदिकेने लांबलचक उखाणा घ्यायला सुरुवात केली. त्यावर पटकन नाव घ्या हो.. असं म्हणत पवारांनी या निवेदिकेला उखाणा पूर्णही करायला लावला. त्यानंतर शरद पवार यांनी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांना उखाणा घेताय का ? अशी विचारणा केली.

एका कार्यकर्त्याने उत्साहात उखाणाही घेतला.. त्यानंतर मात्र पवारांनी उखाणा कसा सोप्या आणि सरळ भाषेत असावा असं म्हणत ‘नावाची काय बिशाद ; प्रतिभा माझ्या खिशात’ असं हातवारे करत उखाणा घेतला आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकवला. याप्रसंगी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टाळ्या वाजत बाबांच्या उखाण्याला दाद तर दिलीच. मात्र माईकजवळ येत आता संध्याकाळी बाबांना घरी आईकडून नो एंट्री होईल. हे रेकॉर्ड करु नका, नाहीतर बाबांना घराबाहेरच झोपावं लागेल, असं म्हणत उपस्थितांमध्ये हास्य फुलवलं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button