breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

U-19 WC मधल्या भारतीय टीमच्या सदस्यांनाही कोरोनाची लागण, बीसीसीआयने दिली माहिती

ICC च्या 19 वर्षीय खालील पुरूष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारताच्या U-19 संघात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही सदस्यांची RTPCR आणि अँटीजेन टेस्ट केल्यानंतर कोव्हिडचा शिरकाव झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे बुधवारी सकाळी आयर्लंड विरोधातल्या ब गटातील दुसऱ्या सामन्यापूर्वी 17 पैकी सहा सदस्यांना वगळण्यात आलं आहे.

काय आहे या सहा सदस्यांचा मेडि?कल स्टेटस

सिद्धार्थ यादव- RTPCR टेस्ट पॉझिटिव्ह

मानव पारेख-लक्षणं आहेत, मात्र टेस्टचा रिझल्ट येणं बाकी. RAT चा रिझल्ट निगेटिव्ह

वासू वत्स-कोरोनाची लक्षणं आहेत मात्र RTPCR चा रिझल्ट येणं बाकी. RAT चा रिझल्ट निगेटिव्ह

यश धूल-RAT चा रिझल्ट पॉझिटिव्ह

आराध्य यादव- RAT चा रिझल्ट पॉझिटिव्ह

एस. के. रशिद- RAT चा रिझल्ट पॉझिटिव्ह

या सदस्यांच्या आरोग्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत त्याचप्रमाणे व्यवस्थापन आणि कोचिंग ग्रुप यांच्या संपर्कात आहोत. सर्व खेळाडू आयसोलेशनमध्ये आहेत. तसंच बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असतील असं जय शाह यांनी सांगितलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button