breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

ऑस्ट्रेलियात पावसाने वणवे घटले; पण पुराचा धोका

महाईन्यूज |

वादळी पावसाने पूर्व ऑस्ट्रेलियात वणवे विझले आहेत, पण आता काही भागात पुराची समस्या निर्माण झाली आहे. दक्षिण व आग्नेय भागात अजूनही वणवे चालू असून तेथे पाऊस पडलेला नाहीये. कांगारू बेटावरही अजून पाऊस पडला नसल्याने तेथील प्राणी— वनस्पतींनी संपन्न वन्यजीवन धोक्यात आलेले आहे. न्यू साऊ थ वेल्सच्या अग्निशमन सेवेने म्हटले आहे, की अजून तेथे ७५ वणवे सुरू आहेत. आधी ही संख्या १०० होती. पाऊ स व गारठय़ाने वणवे विझवण्यास मदत होत आहे.

उत्तरेकडील क्वीन्सलँड राज्यात वादळी पाऊ स झाला आहे. त्यामुळे वणव्यांची संख्या कमी झाली. काही ठिकाणी पूर आला असून रस्ते बंद झालेले आहेत. आधुनिक ऑस्ट्रेलियन इतिहासात या दोन राज्यांत मोठय़ा प्रमाणावर दुष्काळ होता. काही ठिकाणी शुक्रवारी जोरदार पाऊस झाला आहे. दशकभरातील पावसापेक्षा अधिक प्रमाणात पाऊ स हा शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात झाला आहे. न्यू साऊ थ वेल्सच्या दक्षिणेकडे व शेजारील व्हिक्टोरिया राज्यात वणवे सुरूच असून रविवारी व सोमवारी या भागात आणखी पावसाची शक्यता असून त्यामुळे वणव्यांची संख्या आणखी कमी होणार आहे. हवामान बदलांमुळे हे वणवे लागले असून आतापर्यंत पाच महिन्यात २८ बळी गेले आहेत. पूर्व व दक्षिण ऑस्ट्रेलियाला दुष्काळाचा फटका बसला असून तेथे पशुधन कमी झाले आहे, दोन हजार घरे वणव्यात जळाली आहेत.कांगारू बेटांवर वणवे सुरूच असून वन्यजीवन धोक्यात आले आहे. झाडावर राहणारे कोआला प्राणी व पक्षी वणव्यात नष्ट झाले आहेत. आतापर्यंत उन्हाळा निम्मा संपला आहे, त्यामुळे वणव्यांनी आणखी हानी होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button