breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

इंग्रजी विषयात कमी मार्क मिळाल्यामुळे विद्यार्थ्याने केली आत्महत्या

कव्हळा येथील एका बारावीच्या वाणिज्य विभागाच्या विदयाथ्यांने इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेतकरी पुत्र असलेल्या या विद्यार्थ्याला 80 टक्के गुण मिळाले होते. तरीही त्याने केलेल्या आत्महत्येबद्दल खंत व्यक्त केली जात आहे.

अमडापुर पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कव्हळा येथील विनायक संतोष लांडे (वय 18) याचे प्रेत आज (17 जुलै) रोजी सकाळी 5 वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत मिळुन आला. त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याचे सांगितल्या जात आहे. 80 टक्के गुण प्राप्त झाले असतांनाही इंग्रजीतील कमी गुणामुळे त्याला नैराश्याने ग्रासले अन त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

या बाबत गजानन कुंडलिक लांडे (रा. कव्हळा) यांनी अमडापुर पोलिस स्टेशनला माहिती दिली की, विनायकचा नुकताच 12 वी परिक्षेचा निकाल लागला. यामध्ये त्याला एका विषयामध्ये गुण कमी मिळाल्याने त्याने नैराश्यातुन सकाळी 6 वाजेला खामखेड़ शिवारातील स्वताच्या शेतातिल आंब्याच्या झाड़ाला दोरी च्या सह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अमडापुर पोलिसांनी आकास्मित मृत्युची नोंद घेऊन पुढील तपास ठाणेदार अमित वानखेड़े यांच्या मार्गदर्शना खाली ए.एस.आय लक्ष्मण टेकाळे,विनोद वैद्य हे करीत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button