breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आला रे आला व्हॉट्सऍपचा डार्क मोड आला!

मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून व्हॉट्सऍपकडून डार्क मोड आणला जाणार असल्याची चर्चा होती. अखेर तो दिवस उगवला आहे. व्हॉट्सऍपकडून बिटा व्हर्जन वापरणाऱ्यांसाठी डार्क मोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. लवकरच तो सर्व एँड्राईड आणि आयओएस मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

WABetaInfo वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सध्या व्हॉट्सऍप बिटा एँड्राईड वापरकर्त्यांसाठी डार्क मोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. जर तुम्ही बिटा व्हर्जन वापरत असाल तर तुम्हाला व्हॉट्सऍपचे २.२०.१३ व्हर्जन तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावे लागेल. या व्हर्जनमध्ये नवे डार्क मोड फिचर देण्यात आले आहे.

व्हॉट्सऍपच्या सेटिंग्जमध्ये गेल्यावर चॅट्स विभागात डार्क मोड पर्याय देण्यात आला आहे. यालाच तिथे डार्क थीम असे म्हटले आहे. डार्क मोड सुरू करण्यासाठी ग्राहकांना पुढील पद्धतीने जावे लागेल. सेटिंग्ज – चॅट्स – डिस्प्ले – थीम – डार्क थीम.

डार्क मोड देताना व्हॉट्सऍपकडून विविध इतर थीम्स उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचीही चर्चा होती. ती चर्चाही खरी ठरल्याचे दिसते आहे. व्हॉट्सऍपकडून एकूण चार थीम्स ग्राहकांना देण्यात आल्या आहेत. त्यातून एक त्यांना निवडायची आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button