breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यात अडीच लाख ड्रोनची नोंदणी नाही!

मुंबई | महाईन्यूज

  • नोंदणीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश

दहशतवादी हल्ल्यांची बदलती पद्धत लक्षात घेऊन मुंबईसह राज्यात नोंदणी न झालेल्या ‘ड्रोन’बाबत व्यूहरचना तयार करण्याची सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य पोलीस दलातील अधिकाऱ्यांना केलेली आहे. आजघडीला राज्यात नोंदणी नसलेले अडीच लाख ड्रोन असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे. प्रत्येक ड्रोनची नोंदणी करणे, निर्मितीमागील हेतू आणि संभाव्य वापर याबाबत माहिती मिळवण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश बैठकीत दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या वर्षी ऑग्स्ट महिन्यात वेनेझुएलाच्या अध्यक्षांवर ड्रोनद्वारे प्राणघातक हल्ला घडविण्यात आला होता.या घटनांचा आधार घेत देशमुख म्हणाले, १९९३मध्ये पहिल्यांदा ‘आरडीएक्स’ या शक्तिशाली स्फोटकाचा वापर करून मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्यात आले होते.  २००१मध्ये संसदेवर अतिरेकी हल्ला झाल्यानंतर महत्त्वाच्या आस्थापनांमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची, प्रत्येक वाहनाची झाडाझडती घेतली जाऊ लागली आहे. २००८मध्ये मुंबईवरील हल्ल्यानंतर सागरी सुरक्षेवर अधिक भर देण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button