breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

“पार्थ पवार तुम आगे बढो…, हम तुम्हारे साथ है…”, मुस्लीम कामगार बांधवांनी परिसर दणाणून सोडला

कळंबोली, (महा-ई-न्यूज) – येथील स्टील चेंबर्समधील मुस्लीम कामगार बांधवांशी राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज सायंकाळी पाच वाजता संवाद साधला. गेल्या पाच वर्षात याठिकाणी रस्ता झाला नाही. कामगारांना सुविधा मिळत नाहीत. एवढेच नाही, तर व्यावसायिकांना समाधानाने व्यवसाय देखील करू दिला जात नसल्याची व्यथा मुस्लीम बांधवांनी पार्थ पवार यांच्यापुढे मांडली. त्यावर “कामगार हा देशाचा कणा आहे, कामगार आणि कष्टक-यांच्या पाठीवर देशाची सुबत्ता अवलंबून आहे”. आगामी काळात कामगारांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न करेन, अशी ग्वाही पार्थ पवार यांनी दिली. त्यावर “पार्थ पवार तुम आगे बढो… हम तुम्हारे साथ है…” अशा घोषणा कामगारांनी दिल्या.

मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ कळंबोली येथील स्टील चेंबर्स याठिकाणी मुस्लीम कामगार बांधवांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी आमदार बाळाराम पाटील, माथाडी कामगार संघटनेचे नेते बाळा मराठे, नगरसेवक गोपाळ भगत, संपतराव गोडसे, राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सातारा युवक अध्यक्ष तेजस शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

कुर्लामध्ये याच कामगारांनी मला आमदार केले. त्यामुळे याठिकाणी जागा घेऊन कामगारांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. आगामी काळात हाच कामगार आपल्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे, असे नेते नवाब मलीक म्हणाले.

पार्थ पवार म्हणाले की, आपल्या पक्षामध्ये जातीयवादाला थारा दिला जात नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने आपल्याला मावळ मतदार संघात जास्तीत जास्त उद्योग कसे येतील. याठिकाणच्या कामगारांना काम कसे मिळेल, यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत. कामगारांच्या ज्या काही समस्या असतील, त्या आपण वेळोवेळी पाठपुरावा करून सोडवू. भविष्यात तुमच्यावर जे काही संकट येईल. त्याला मी स्वतः तोंड देण्यासाठी आपल्यासोबत रस्त्यावर उतरेन, असा विश्वास पार्थ पवार यांनी कामगारांना दिला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button