breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आरेतून मेट्रो कारशेड हटवण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई | महाईन्यूज

  • पर्यावरणमंत्र्यांचे आश्वासन; राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न

आरेमधील ‘मेट्रो ३’च्या कारशेडला पर्यायी जागा शोधण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले. देशभरातील पर्यावरण पत्रकारांच्या मंचातर्फे दिलेल्या निवेदनावर त्यांनी सकारात्मक प्रतिक्रीया देत, याबाबतीत तज्ज्ञांशी चर्चा केली जाईल असे त्यांनी मंचाच्या सहसचिवांना सांगितले आहे.

पर्यावरण पत्रकार मंचातर्फे ‘आरेच्या अनुषंगाने मुंबई शहरासाठी वातावरण बदलाचे आव्हान’ या विषयावर मुंबईत पंधरा दिवसांपूर्वी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मंचाचे सहसचिव अतुल देऊळगावकर यांनी या कार्यशाळेतील चर्चेवर आधारीत निवेदन पर्यावरण मंत्र्यांना सोमवारी सादर केले. आरेतील कारशेड दुसरीकडे हलवावी, सार्वजनिक बस वाहतूक, स्वतंत्र बस मार्गिका वाढवण्यावर भर द्यावा अशी मागणी याद्वारे करण्यात आली. तसेच राज्यातील पर्यावरणाच्या खालावल्या परिस्थितीवर तातडीने कृती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

  • निवेदनावर पर्यावरणमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत,

आरेमधील कारशेड दुसरीकडे हलवण्याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले जाईल असे सांगितले. तसेच राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील आणि पाण्याच्या पुर्नवापरावर भर दिला जाईल असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिल्याचे, अतुल देऊळगावकर यांनी सांगितलेले आहे.

मुंबईबरोबरच राज्यभरात वीजेवर धावणाऱ्या बसगाडय़ांची संख्या वाढवण्यात येईल असे नमूद केले. मुंबईमध्ये चार लाख झाडे लावण्याचे उद्दीष्ट असल्याचे मंत्र्यांनी यावेळी सांगितले. वातावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर या विषयाशी संबंधित सर्व विभागांना एकत्र घेऊन एका सेमिनारचे आयोजन करण्यात येईल असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button