breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#CoronaVirus: कोल्हापूर मध्ये आजपर्यंत ७०८ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ६०१ जण कोरोनामुक्त

कोल्हापूर जिल्ह्यात दीर्घ कालावधी नंतर करोना उपचारार्थ दाखल झालेल्या रूग्णांची संख्या शतकाच्या आत आली आहे. शुक्रवारी ही संख्या ९९ इतकी झाली होती. त्यामुळे जिल्ह्यातील करोना संसर्ग आटोक्यात येताना दिसत आहे. बरे होवून घरी परतणारे रुग्ण संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आज अखेर ७०८ रूग्णांपैकी ६०१ जणांना घरी पाठवण्यात आले आहे. आज १३२ प्राप्त अहवालापैकी ११७ अहवाल निगेटिव्ह तर १२ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

टाळेबंदीच्या नियमात सवलत मिळण्याची अपेक्षा फोल ठरली आहे. शासनाच्या ३१ मे रोजीच्या आदेशाप्रमाणे जिल्हयात अंमलबजावणी सुरु असून बदल केलेला नाही. तसेच वेगळे आदेश दिले नसल्याचे जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी स्पष्ट केले. आवश्यकतेनुसार मार्केट यार्डमध्ये मुंबई तसेच नवी मुंबई येथे जाऊन आलेल्या चालक आणि वाहकांच्या करोना चाचणी तपासणीचे नियोजन असल्याचेही स्पष्ट केले. बंदी आदेशाप्रमाणे रात्री ९ ते सकाळी ५ या कालावधीत लोकांच्या, वाहनांच्या हालचालींवर बंदी घालण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button