breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

मेयोनिज खाण्यासोबत केसांसाठीही फायदेशीर…

त्वचेप्रमाणे आपल्याला केसांचीही तितकीचं निगा राखणं गरजेचे असते. बदलते वातावरण आणि दिवसेंदिवस वाढत जाणारे प्रदुषण यांमुळे आपली त्वचा तसेच केस खूप खराब होत जातात. केसांमध्ये कोंडा होणे, केस गळणे तसंच खाज येणे अशा वेगवेगळ्या समस्या दैनंदीन जीवनात येत असतात. जर तुम्हाला सुद्धा या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर ज्या मेयोनीजचा वापर सॅण्डवीचमध्ये किंवा बर्गरमध्ये खाण्यासाठी करतो त्याच मायोनीजचा वापर केसांसाठीही आपण करू शकतो. ऐकुण आश्चर्य वाटलं ना….पण हे खर आहे मेयोनीजचा वापर हा केसांसाठीही तेवढाच उपयुक्त आहे.

सर्वसाधारणपणे केसांना फाटे फुटणे म्हणजेच केस दोन भागांमध्ये विभागले जातात. त्यामुळेच केस गळण्याची समस्या वाढते. जर दुभंगलेल्या केसांकडे दुर्लक्ष केले तर केस कापावे लागू शकतात. मेयोनीजमध्ये केसांना आवश्यक असणारे पोषक घटक असतात. तसंच केसांना फाटे फुटले असतील. तर मेयोनीजचा वापर फायदेशीर ठरतो. केसांना मजबूती मिळण्यासाठी तसंच केसांना गळण्यापासून रोखण्यासाठी मायोनीजचा वापर करू शकतो.

मेयोनीज आणि एलोवेरा जेलचा वापर करून तुम्ही केसांसाठी उपयुक्त असणारा हे हेअरमास्कचा वापर आपण करु शकणार आहोत. त्यासाठी १ चमचा एलोवेरा जेल मध्ये ३ चमचे मेयोनिज घाला आणि हे मिश्रण केसांना लावा आणि एका तासासाठी सोडून द्या. त्यानंतर केसांना शॅम्पू लावून केस धुवून टाका. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

मेयोनीज आणि बदामाचं तेल मिक्स करुन लावल्याने केस सॉफ्ट राहतात. त्यासाठी मास्क तयार करण्यासाठी मेयोनीज आणि बदामाचं तेल आणि त्यात ३ अंडी मिक्स करा. आणि हे मिश्रण केसांना लावा. त्यानंतर एका तासाने केस शॅम्पूने धुऊन टाका. असे केल्यास फरक दिसून येईल. तसंच फाटे असणारे केस व्यवस्थित दिसू लागतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button