breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तांनी मागितली समस्त पिंपरी-चिंचवडकरांची ‘माफी’

पंतप्रधान आवास योजनेची सोडत रद्द; महापौर उषा ढोरेसह भाजप पदाधिकाऱ्यांचा ठिय्या आंदोलन

पिंपरी |महाईन्यूज|

पंतप्रधान आवास योजनेची सोडत प्रशासनाने अचानक रद्द केल्याने महापौर उषा ढोरे यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडला. मात्र, राजशिष्टाचाराचे पालन करणे आवश्यक आहे. शेवटच्या क्षणापर्यंत सोडत व्हावी यासाठी आम्ही आग्रही होतो. पण, राजशिष्टाचाराचे पालन झालेले नाही. त्यामुळे सोडत रद्द केल्याचे आयुक्तांनी सांगत त्यांनी समस्त पिंपरी चिंचवडकरांची माफी मागितली.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढण्यात येणार होती. त्यामुळे इच्छुक नागरिकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमास महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी सभापती संतोष लोंढे यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

महापाैर माई ढोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी, नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करत आयुक्त श्रावण हर्डिकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या बिघाडी सरकारचा धिक्कार असो, आयुक्तांचे करायचे काय, खाली डोकं, वर पाय, ‘आयुक्त साहेब माफी मागा, माफी मागा, राष्ट्रवादीपुढे झुकणा-या आयुक्तांचा धिक्कार असो’, अशा जोरदार घोषणा दिल्या. महापौरांचा अपमान झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. कोणाच्या सांगण्यावरून कार्यक्रम रद्द केला हे जाहीर करण्याची मागणी भाजपच्या वतीने केली जात आहे.

आयुक्त हर्डिकर म्हणाले की, राजशिष्टाचाराचे पालन करणे, हे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला बंधनकारक आहे. राजशिष्टाचाराचे पालन करुन सोडत करण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो. सर्वाच्या समन्वयाने कार्यक्रम व्हावा, म्हणून प्रयत्नशिल होतो. त्यामुळे सर्व पिंपरी चिंचवडकरांची, महापाैर, पदाधिका-यांची क्षमा मागतो, असं त्यांनी नम्र पणे सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button