breaking-newsक्रिडा

आयसीसीने बैठकीत घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली :  कोरोना  व्हायरसचा वाढता कहर पाहता ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 World Cupचे आयोजन होणार की  नाही, या मुद्द्यावर आयसीसीने बुधवारी आयोजित केलेल्या बैठकीत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदाच्या टी -२० विश्वचषकातील भवितव्याबद्दल निर्णय घेण्यासाठी आणखी एक महिना थांबण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीत ठोस निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला आणखी वेळ हवा आहे. जुलै महिन्यात या संदर्भात ICC ची बैठक होणार आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्समधून झालेल्या बोर्डाच्या बैठकीनंतर आयसीसीचे मुख्य कार्यकारी मनु मनु सावनी म्हणाले, ‘आम्हाला यावर निर्णय घेण्यासाठी एकच संधी मिळणार आहे आणि ती संधी योग्यच असली पाहिजे. त्यामुळे आम्ही आमच्या सदस्य, खेळाडू आणि सरकारकडून सतत सल्ले घेत आहोत ज्यामुळे आम्ही योग्य त्या निर्णयावर पोहोचू. असं ते म्हणाले. 

दरम्यान,  पुढील महिन्यापर्यंत करोनाची स्थिती पाहून विश्वचषकाच्या आयोजनाबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं  आयसीसीकडून सांगण्यात आलं आहे. जर टी -२० विश्वचषकाच्या आयोजनावर स्थगिती देण्यात आली तर आयपीएलचं आयोजन करण्यात येवू शकतं असं देखील सांगण्यात येत आहे. बीसीसीआयसाठी आयपीएल अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आयपीएलचे सामने रंगले नाहीत तर जवळपास ३ हजार कोटींचे नुकसान होवू शकेल. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button