breaking-newsआंतरराष्टीयक्रिडाताज्या घडामोडी

आयपीएल सुरु होण्याआधीच CSK संघाला मोठा झटका, सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोना

दुबई | आयपीएलचं तेरावं सीझन सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाला मोठा झटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका खेळाडूचादेखील समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र, सपोर्ट स्टाफमधील नेमकं किती जणांना आणि कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएलचं तेरावं सीझन दुबईत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईत 19 सप्टेंबरपासून आयपीएलचं तेरावं सीझन सुरु होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीएसके संघ 21 ऑगस्ट रोजी दुबईत दाखल झाला. बीसीसीआयच्या नियमानुसार संपूर्ण संघ आठवडाभर क्वारंटाईन होता.

सीएसके संघाचा क्वारंटाईन कालावधी शुक्रवारी संपणार होता. त्यानंतर सीएसकेचे खेळाडू सरावाला सुरुवात करु शकणार होते. मात्र, संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे संपूर्ण संघाचा क्वारंटाईन कालावधी आणखी आठवडाभरासाठी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार दुबईत आल्यानंतर प्रत्येक संघाच्या खेडाळू आणि सपोर्ट स्टाफमधील कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी तीन वेळा करणं अनिवार्य आहे. दुबईत येण्याआधी भारतात प्रत्येक खेळाडू आणि कर्मचाऱ्याची पाचवेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. पाचवेळा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सर्व खेळाडूंना दुबईत येता आलं. तर विदेशातील खेळाडूंना दुबईत येण्याआधी 14 दिवस होम क्वारंटाईन आणि दोनवेळा चाचणी करावी लागली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button