breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

Breacking News: नमाज पठण करणाऱ्या सैनिकांवर हूती विद्रोहींचा बॅलेस्टिक मिसाइल हल्ला; 70 जणांचा मृत्यू

यमन | महाईन्यूज

मारिब प्रांतात इराण समर्थित हूती विद्रोहिंनी शनिवारी बॅलेस्टिक मिसाइल आणि ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात यमनचे 70 सैनिक मारले गेलेत. सौदी अरब मीडियाने सांगितल्यानुसार मारिब प्रांतातील एका मशिदीत सैनिक नमाज पठण करत असताना हा हल्ला करण्यात आलेला आहे.

हल्ल्यानंतर यमनची राजधानी सनामध्ये सौदी समर्थित सुरक्षा दलाने प्रत्युत्तर देणे सुरू केले आहे. सौदी अरब यमनमध्ये इराण समर्थित हूती विद्रोहिंविरोधात मागील 5 वर्षांपासून लढत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितल्यनुसार, या चकमकित दोन्हीकडचे अंदाजे 22 जण मारले गेले आहे. यमनचे राष्ट्रपती अब्दु-रब्बू मंसूर हादी यांनी या दहशतवादी घटनेची तीव्र शब्दात निंदा केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button