breaking-newsमनोरंजन

आमिरचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंह चड्डा’ चित्रपट लांबणीवर

कोरोनाच्या पार्श्वभूीमीवर पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे सिनेमागृह बंद आहेत. त्यामुळे अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत आहेत. मात्र, काही चित्रपट हा लॉकडाऊन उठण्याच्या प्रतिक्षेत आहेत, कारण त्यांना सिनेमागृहातच चित्रपट प्रदर्शित करायचे आहेत. त्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. त्यामध्येच आमिर खान अभिनीत लाल सिंह चड्डा २०२१ च्या डिसेंबर महिन्यात प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.

आमिर खान आणि नाताळचे नाते जुने आहे. नाताळ दरम्यान प्रदर्शित झालेले त्याचे सर्व चित्रपट प्रचंड यशस्वी ठरले आहेत, ज्यात 3 इडियट्स, पीके, धूम 3, दंगल इत्यादी चित्रपटांचा समावेश आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘लाल सिंह चड्ढा’ टॉम हैंक्सच्या फॉरेस्ट गम्पवर आधारित आहे. लॉकडाउनच्या आधी, चंदिगड आणि कोलकातामध्ये चित्रपटाच्या काही भागाचे शूट झाले आहे.

जेव्हा निर्मात्यांनी आमिर खानचा शीख व्यक्तिरेखेतील फर्स्ट लुक जारी केला होता तेव्हापासूनच या चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. यातच सद्य स्थिती लक्षात घेऊन, आमिर आणि निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाच्या नव्या तारखेची घोषणा केली असून ती या डिसेंबरवरून पुढच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये स्थानांतरित केली आहे कारण हा चित्रपट एक शानदार रिलीजचा हकदार आहे.

आमिर खान प्रोडक्शन्स ची ‘लाल सिंह चड्ढा’ वायकॉम18 स्टूडियो द्वारे प्रस्तुत असून, ज्यामध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान मुख्य भूमिकेत आहेत. यासोबतच मोना सिंह एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अतुल कुलकर्णी द्वारे लिखित आणि अद्वैत चंदन द्वारे दिग्दर्शित करण्यात आला असून प्रीतम यांचे संगीत आणि अमिताभ भट्टाचार्य यांनी गीत लेखन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button