breaking-newsराष्ट्रिय

आमची भारत माता काँग्रेसची माता एकच सोनिया गांधी – वसुंधरा राजे

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी काँग्रेस आणि सोनिया गांधींवर अत्यंत बोचरी टीका केली आहे. भारत माता भाजपाची आई आहे तर काँग्रेसची आई फक्त एकच आहे त्या म्हणजे सोनिया गांधी असे वसुंधरा राजे म्हणाल्या. त्या बुंदी येथील जनसभेमध्ये बोलत होत्या. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओचा संदर्भ देऊन त्यांनी काँग्रेसवर ही टीका केली.

काँग्रेस कार्यकर्ते भारता माता की जय बोलत असताना त्यांना मध्येच थांबवून सोनिया गांधी की जय बोलण्यास सांगण्यात आल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओशी छेडछाड करण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. ते लोक माझ्या नावाची घोषणाबाजी करत होते. म्हणून मी त्यांना थांबवून शांत राहण्यास सांगितले.

Embedded video

ANI

@ANI

#WATCH: Hamari Bharat mata hai, unki (Congress) mata ek hi hai (Sonia Gandhi): Rajasthan Chief Minister Vasundhara Raje in Bundi. #RajasthanElections2018

भाजपाचा आयटी सेल खूप हुशार आहे. त्यांनी तथ्यांची मोडतोड केली व वादग्रस्त पद्धतीने तो व्हिडिओ समोर आणला असा दावा काँग्रेस नेते बी.डी. काला यांनी केला. या व्हिडिओमध्ये काला आपल्या समर्थकांना भारत माता की जय ही घोषणा देण्यापासून रोखताना दिसत असून त्याऐवजी सोनिया गांधी की जय, राहुल गांधी की जय अशा घोषणा द्यायला सांगत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button