breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नगरसेवक दत्ताकाका साने यांना महासभेत वाहली श्रध्दाजंली

आॅनलाईन महासभा 20 आॅगस्ट पावणेदोन वाजेपर्यंत तहकूब

पिंपरी |महाईन्यूज|

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे लढवय्ये नगरसेवक तथा माजी विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने यांना आज (सोमवारी) झालेल्या महापालिका सर्वसाधारण सभेत श्रध्दाजंली वाहण्यात आली. तसेच साने यांचे नाव वायसीएम रुग्णालयातील कोविड लॅंब अथवा भोसरी रुग्णालयास द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेची जूलै महिन्याची महासभा आज गुगल मीटद्वारे आॅनलाईन घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर उषा ढोरे होत्या. महासभेत महापाैर उषा ढोरे, उपमहापाैर तुषार हिंगे, सभागृह नेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेनेचे राहूल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, माजी पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापाैर राहूल जाधव, माजी स्थायी सभापती सीमा सावळे यांच्यासह अन्य नगरसेवकांनी स्व. दत्ताकाका साने यांच्या सोबत काम केलेल्या अनेक आठवणींना उजाळा देत आपण एक लढवय्या कार्यकर्ता गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

दरम्यान, महापालिकेच्या भोसरी रुग्णालय अथवा वायसीएम रुग्णालयातील कोविड-19 लॅंबला स्व.दत्ताकाका साने यांचे नाव देण्याची मागणी यावेळी बोलताना व्यक्त केली. त्यावर पक्षनेते ढाके यांनी सर्वपक्षीय बैठक घेवून त्यावर योग्य तो निर्णय घेवू या, असं आश्वासन यांनी दिले आहे. तसेच या आॅनलाईन महासभेत कित्येक नगरसेवकांनी सहभाग घेतला नसल्याचे दिसून आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button