breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार राम कदमांच्या बेताल वक्तव्याचा निषेध, राष्ट्रवादीकडून त्याच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – दहीहंडी उत्सवात मुंबईतील घाटकोपरचे आमदार व भाजप प्रवक्ते राम कदम यांनी मुलींविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचे तीव्र पडसाद आज (बुधवारी) पिंपरी-चिंचवडमध्ये उमटले. आमदार राम कदम यांच्या प्रतिमेला राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसच्या वतीने जाहीरपणे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच या घटनेचा निषेध करीत कदम यांना निलंबित करा, अशी मागणी केली आहे.

आमदार राम कदम दरवर्षी दहीहंडी उत्सव दणक्यात करतात. सेलिब्रिटींची हजेरी त्याला असते. यावेळी, तर मुख्य़मंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. ते येण्यापूर्वी कदम यांनी भाषण केले. मतदारांची कुठली कुठली कामे करू असे सांगताना त्यांनी मुलींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. एखाद्या तरुणाला नकार दिलेल्या तरुणीला पळवून आणून मी त्याला मदत करीन, असे वक्तव्य कदम यांनी केले होते.

दरम्यान, राज्यासह देशात भाजप आमदार राम कदम यांच्या विधानाचा निषेध करण्यात येत असून पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी महिला काॅंग्रेसनेही निषेध व्यक्त करुन त्यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन केले. त्यांनी मुलीची माफी मागावी, त्यांना निलंबित करावे, अशीही मागणी केली आहे. यावेळी महिला शहराध्यक्ष व नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका उषा वाघेरे, माई ढोरे, शितल काटे, सुलक्षणा धर, विनया तापकीर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयुर कलाटे आदी उपस्थित होते.

 

माझ्या कार्यकर्त्याला आमदार राम कदमाची मुलगी आवडली आहे. त्यांनी सांगितले की, कुठलीही मुलगी आवडली तर आणून देणार आहेत. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की, त्यांची मुलगी ते आणून देणार आहेत का? असा सवाल विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केला आहे. 

पालकमंत्री गिरीष बापट, आमदार प्रशांत परिचारिक, उपमहापाैर श्रीपाद छिंदम आणि आता आमदार राम कदम यांनी विविध बेताल वक्तव्य केले आहे. त्या सर्वांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाठिंशी घालत आहेत. त्यामुळे बेटी पढाआे, बेटी बचाआे या एेवजी बेटी भगाआे असा नारा त्यांनी दिला. त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन कायदेशीर कारवाई करावी, असी मागणी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button