breaking-newsराष्ट्रिय

आणखी एका अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अटक

बेंगळुरू – अमली पदार्थांचं सेवन केल्याप्रकरणी बेंगळुरू पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे विभागाने (सीसीबी) मंगळवारी संजना गलरानी या कन्नड अभिनेत्रीला अटक केलीय. या प्रकरणात अगोदर रागिणी द्विवेदी हिलाही अटक करण्यात आली आहे. संजनाला पोलिसांनी इंदिरानगर परिसरातील घरातून ताब्यात घेतलं. आधीच अटकेत असलेला वीरेन खन्ना याच्या घरावर पोलिसांनी छापाही मारला. या प्रकरणात आत्तापर्यंत एकूण १३ जणांना आरोपी बनवण्यात आलंय तर पाच जणांना अटक करण्यात आलीय.


कन्नड सिने इंडस्ट्रीत होत असलेल्या ड्रग्जच्या वापराची चौकशी मध्यवर्ती गुन्हे विभागाकडून सुरू आहे. याच प्रकरणात चौकशीनंतर मंगळवारी संजना गलरानी हिला अटक करण्यात आली. यापूर्वी शहरात हाय-प्रोफाईल पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवण्यासाठी अभिनेत्री रागिनी द्विवेदी हिला शहर पोलिसांनी अटक केली होती. यानंतर मंगळवारी मध्यवर्ती गुन्हे विभागानं गलरानीच्या इंदिरा नगर परिसरातील घरावर छापा टाकला त्यानंतर तिला अटक करण्यात आलीय. यानंतर संजनाला मध्यवर्ती गुन्हे विभागाच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं.

न्यायालयाकडून सर्च वॉरंट घेतल्यानंतर संजनाच्या घरी छापा टाकण्यात आला होता, असं बेंगळुरूचे सहपोलीस आयुक्त संदीप पाटील यांनी म्हटलंय. संजनाचा एक मित्र राहुल याला आरोपी बनवण्यात आलं तेव्हापासून आमची नजर संजना गलरानीवर होती असं मध्यवर्ती गुन्हे विभागानं म्हटलंय.

संजना हिचा जन्म बेंगळुरूमध्येच झालाय. तिनं २००६ मध्ये तामिळ सिनेमा ‘ओरू कढाल सीवीर’ सिनेमातून पदार्पण केलं होतं. तसंच कन्नड सिनेमा ‘गंदा हेंदाती’मध्येही तिनं काम केलंय.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button