breaking-newsमुंबई

पालघरमध्ये एकाच दिवसात आढळले 308 नवे पॉझिटिव्ह रुग्ण

पालघर । पालघर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज दिवसभरात जिल्ह्यामध्ये कोरोनाचे तब्बल ३०८ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ९ हजार ३४९ वर पोहचला आहे.

तर आजवर १७८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्याच्या विविध रुग्णालयांमध्ये 2 हजार 514 कोरोनाबाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. तर 6 हजार 657 कोरोनाबाधित रुग्ण वैद्यकीय उपचारानंतर बरे झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button