breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

बाळासाहेब-उद्धव ठाकरेंचा अखेरचा फोटो, फोटो पाहून रोहित पवार म्हणाले, मी नि:शब्द झालो!

मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठातील ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा’त दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट दिली होती. यानंतर रोहित पवार यांनी या प्रदर्शनातील एक फोटो ट्विट केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेवेळी हा फोटो टिपण्यात आला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनातील हा फोटो खूप बोलका आहे. तो पाहून मी तर निःशब्दच झालो, असं रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

मुंबई विद्यापाठातील ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा’त भरलेल्या या प्रदर्शनात नामवंत छायाचित्रकारांनी काढलेले बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. या फोटोत बाळासाहेब ठाकरे यांचे अनेक मान्यवरांसोबतचे फोटो आहेत. कामगार नेते, बंदसम्राट जॉर्ज फर्नांडीस, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन, शरद पवार यांच्यासोबतचे बाळासाहेबांनी घालवलेले क्षण कॅमेराच्या माध्यमातून टिपण्यात आले आहेत. त्याच चित्रांचं प्रदर्शन मुंबई विद्यापीठात भरवण्यात आलं आहे.

चित्र प्रदर्शनात बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्ययात्रेतील उद्धव ठाकरे यांचा अत्यंत इमोशनल फोटो आहे. याच फोटोवर उभा राहून आमदार रोहित पवार यांनी फोटो काढलाय. तसंच तो फोटोही त्यांनी ट्विट केलाय. हा फोटो पाहून नि:शब्द झाल्याच्या भावना त्यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केल्या. मुंबई विद्यापीठाच्या ‘बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा’त भरवलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनातील हा फोटो खूप बोलका आहे. तो पाहून मी तर निःशब्दच झालो, असं रोहित पवार म्हणाले.

  • आदित्य ठाकरे यांनी आठवणी जागवल्या

मुंबई विद्यापाठातील’बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्रा’त भरलेल्या या प्रदर्शनाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते शरद पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. त्याप्रसंगी बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, प्रमोद महाजन यांची एकत्रित छायाचित्रे पाहून आदित्य ठाकरे यांनी दिग्गजांच्या मैत्रीपूर्ण राजकारणाच्या आठवणी जागवल्या. मातोश्रीवरील बाळासाहेब, आजोबा आणि नातू याबाबतचे किस्सेही सांगितले. तसेच आज बाळासाहेब असते तर मित्राबरोबर युती करुन सरकार स्थापन केल्याचा त्यांना खूप आनंद झाला असता, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button