TOP Newsटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोधसाठी आमदार लांडगेंचा पुढाकार!

  • विरोधी पक्षाच्या शहराध्यक्षांना निवेदन
  • दिवंगत जगताप घराण्याप्रति आदर ठेवूया

पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधन झाले. या दु:खातून जगताप कुटुंबीय आणि त्यांचे सर्वपक्षीय हितचिंतक अद्याप सावरलेले नाही. अल्पावधीत लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये आपण सर्वांनी जगताप कुटुंबीयांसोबत राहीले पाहिजे. ही निवडणूक बिनविरोध करण्याबाबत पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन भाजपा शहराध्‍यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.

निवडणूक आयोगाकडून चिंचवड पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी शहरातील सर्व विरोधी पक्षाच्या शहराध्यक्षांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असलेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे दि. ३ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. या दुखा:तून अद्याप जगताप कुटुंबीय आणि त्यांचे सर्वपक्षीय समर्थक, कार्यकर्ते आणि हितचिंतक अद्याप सावरले नाही. तोच पोटनिवडणुकीची घोषणा झाली.

भूमिपूत्र म्हणून स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड शहरात गेले ३५ वर्षे राजकारण-समाजकारणात योगदान दिले. पक्षीय जोडे बाजुला ठेवून आपल्यासारख्या कार्यकर्त्याला वेळोवेळी ताकद आणि मार्गदर्शन करण्याची भूमिका त्यांनी ठेवली. त्यामुळे तुमच्या-माझ्यासारखे अनेक कार्यकर्ते घडले. सर्वपक्षीय नेत्यांशी तसेच केंद्र आणि राज्यातील सरकारमधील मंत्र्यांमध्ये त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यामुळेच लक्ष्मणभाऊ पिंपरी-चिंचवडचे लोकनेते होते. तसेच, लक्ष्मणभाऊंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदतीमुळेच तुमच्या-माझ्यासारखे कार्यकर्ते घडले. अनेकांना महापालिका आणि पक्षांच्या माध्यमातून विविध महत्वाच्या पदांवर आपल्याला संधी मिळाली. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जगताप यांच्या मदतीमुळेच शक्य झाले. हे आपल्याला विसरुन चालणार नाही, असेही आमदार लांडगे यांनी म्हटले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी दि. ३१ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी विरोधी पक्षाच्या शहराध्यक्षांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. लेखी पत्र देवून निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, रिपाइंचे शहराध्यक्ष स्वप्नील कांबळे, भाजपचे प्रदेश सचिव अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सभागृह नेते एकनाथ पवार, नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, मोरेश्वर शेडगे, अनुप मोरे आदी उपस्थित होते.

आज जगताप कुटुंबीय दु:खात आहे. अशा परिस्थितीत आपल्या राजकीय जीवनात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष केलेल्या मार्गदर्शनाची आणि मदतीची परतफेड करण्याची ही वेळ आहे. कारण, केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक, व्यावसायिक जीवनात त्यांनी आपल्याला वेळोवेळी मदतच केली आहे. त्यामुळे आपण सद्सद् विवेकबुद्धीने विचार करुन जगताप कुटुंबीयातून कोणत्याही उमदेवाराविरोधात आपला उमदेवार उभा करु नये, अशी एक पिंपरी-चिंचवडकर म्हणून माझी अपेक्षा आहे.
महेश लांडगे, शहराध्यक्ष तथा आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड.

  • निवडणूक झालीच तर लाखांच्या फरकाने जिंकू : आमदार लांडगे
    पिंपरी-चिंचवडचे लोकनेते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आमदार म्हणून गेल्या १९ वर्षांत शहरात विकासाची गंगा आणली आहे. ही विकासगंगा निरंतर सुरू ठेवण्यासाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाचाच आमदार होणार असल्याची काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. मात्र, निवडणूक झालीच, तर हा विजय लाखाच्या फरकाने असेल. त्यासाठी चिंचवड विधानसभेच्या १३ प्रभागात आजपासूनच मैदानावर उतरून काम सुरू केले आहे, असेही आमदार महेश लांडगे यांनी म्हटले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button