breaking-newsताज्या घडामोडीपुणे

आठ मुलींवर लैंगिक अत्याचार, आरोपपत्र दाखल

इस्लापूर  – कुरळप येथील मिनाई आश्रमशाळेतील आठ मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणातील आरोपी अरविंद पवार (रा. मांगले, ता. शिराळा), स्वयंपाकीण मदतनीस मनिषा शशिकांत कांबळे (रा. चिकुर्डे, ता. वाळवा) या दोघांविरुद्ध पोलिसांनी अतिरिक्त व जिल्हासत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र ३२१ पानांचे आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ९७ साक्षीदार तपासले आहेत.

वारणा-मोरणा शिक्षण संस्था, मांगले संचलित मिनाई प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कुरळप येथे आहे. पवार हा या संस्थेचा संस्थापक सचिव आहे. त्याने मनिषा कांबळे हिच्या मदतीने वसतिगृहात राहणा-या आठ अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याबाबतचे निनावी पत्र पोलिसांना मिळाले होते. पोलिसांनी त्यावरुन चौकशी केली. त्यामध्ये तथ्य आढळल्याने या दोघांविरुद्ध कुरळप पोलीस ठाण्यात २७ सप्टेंबर २०१८ रोजी बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार, व अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणामुळे संपूर्ण सांगली जिल्ह्यासह राज्यभर खळबळ उडाली. स्थानिक पातळीवर तसेच तालुकास्तरावर पवार याच्या हिन कृत्याचा निषेध नोंदवण्यात आला. दरम्यान, अनेक राजकीय नेते व सामाजिक संघटनांच्या पदाधिका-यांनी कुरळपला भेट देऊन या प्रकरणांतील दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली होती. पोलिसांनीही या प्रकरणात कसलीही कसर न ठेवता, कारवाई केली. संशयित आरोपी पवार व कांबळे यांना त्वरीत अटक केली. काही दिवस हे दोघेही पोलीस कोठडीत होते.

या गुन्ह्याचा तपास जत पोलीस उपविभागीय अधिकारी श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांनी केला. त्यानंतरचा तपास इस्लामपूर उपविभागीय अधिकारी किशोर काळे यांनी केला. जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा व अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांचे या तपासासाठी मार्गदर्शन लाभले. पोलिसांनी या गुन्ह्यात ९७ साक्षीदार तपासून ३२१ पानांचे आरोपपत्र तयार केले. ते शुक्रवारी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय यांच्याकडे दाखल केले. या गुन्ह्याबाबत आणखी कोणास माहिती द्यावयाची असल्यास संपर्क साधावा. नाव, गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button