breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोळीबाराने अहमदनगर हादरले : १ ठार, १ जखमी

अहमदनगर –  पाथर्डी तालुका गोळीबाराच्या घटनेने हादरला. तालुक्यातील कामतशिंगवे शिवारात जुन्या वादातुन झालेल्या गोळीबारात एकजण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. योगेश एकनाथ जाधव (वय-२५) असे मृत पावलेल्याचे नाव असून, त्याचे वडील एकनाथ जाधव हे जखमी झाले आहेत. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

पोपट गणपत आदमाने असे गोळीबार करणाऱ्या संशयिताचे नाव असून, कामतशिंगवे शिवारात स्वत:च्या बंदुकीतून त्याने योगेश एकनाथ जाधव(वय-२५) व एकनाथ जाधव यांच्यावर गोळीबार केला. पोपट गणपत आदमाने यास अटक केली आहे. आदमाने सैन्यदलातून सेवानिवृत्त असून त्याला मिळालेल्या बंदुकीतून त्याने हा गोळीबार केला.

या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अधिक तपास सुरु आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button