breaking-newsताज्या घडामोडीलेख

‘आज चॉकलेट’…चॉकलेटचा जन्म झाला कुठून,कधी आणि कसा ?

व्हॅलेंटाईन वीकचा आजचा तिसरा दिवस आहे..आणि हा चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. चांगल्या कामाची सुरुवात नेहमी गोड खाऊन करावी असं म्हटलं जात… आणि त्यात चॉकलेट आवडत नाही, असा क्वचितच कोणी सापडेल..तसेच आपला किंवा दुस-या कोणाचा मुड ठिक करायचा असेल तेव्हा चॉकलेट खाल्याने तो नक्कीच छान होतो..आणि हे फक्त म्हटलं जात असं नाही तर त्यामागे निश्चित असं एक शास्त्रिय कारणही आहे…

तर लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणा-या या चॉकलेटचा जन्म झाला कुठून आणि कधी ,कसा ? …तर, याबद्दल थोडं जाणून घेऊयात…

चॉकलेट या शब्दाबद्दल बरेच वेगवेगळे संभ्रम आहेत. काहींच्या मते हा शब्द मुळात स्पॅनिश शब्द आहे. २००० वर्षांपूर्वी कोकोनट्स किंवा कोकोचं झाड अमेरिकेच्या जंगलात सापडलं होतं. या झाडाच्या बियांपासून चॉकलेट बनविले जाते. प्रथम चॉकलेट उत्पादक मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत बनलं आहेत.

१५२८ मध्ये जेव्हा स्पेनने मेक्सिकोचा ताबा घेतला तेव्हा आपल्याबरोबर मोठ्या प्रमाणात कोको बियाणे आणि चॉकलेट बनवण्याची उपकरणे स्पेनला घेऊन गेले. चॉकलेट लवकरच स्पेनमधील रईसांसाठी फॅशनेबल पेय बनलं. १६०६ पर्यंत इटलीमध्ये देखील चॉकलेट प्रसिद्ध झालं.

फ्रान्समधील लोकांना चॉकलेट हे आरोग्याच्या दृष्टीने फारच फायदेशीर वाटलं. इंग्लंडमध्ये चॉकलेट १६५० साली आलं.आधी लोक चॉकलेट फक्त पिऊ शकत होते. सर हंस स्लोन या इंग्रजी डॉक्टरांनी दक्षिण अमेरिकेला भेट दिली आणि चॉकलेट खाताही येईल अशी चॉकलेटची रेसिपीही तयार केली होती.

गोड चॉकलेट बनवण्याचे श्रेय युरोपला जाते…त्यांनी चॉकलेटमध्ये दूध आणि साखर टाकून मिश्रण बनवलं आणि ही गोड चॉकलेट सर्वांना मनापासून आवडू लागली. आणि त्यानंतर पाश्चात्य देशानेच चॉकलेट डे ला सुरवात केली…

९ फेब्रुवारीला व्हेलेंटाईन वीक मधील तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा करतात. व्हेलेंटाईनच्या सप्ताहातल्या या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तिला चॉकलेट देऊन आपले एकमेकांवरील प्रेम व्यक्त केलं जातं…तसेच काही कारणास्तव रुसवे-फुगवे आले असतील किंवा कटुता आली असेन तर तेही या दिवशी चॉकलेट देऊन आपण नात्यात पुन्हा गोडवा आणू शकतो…

बाजारात कुप वेगवेगळ्या प्रकारची ,फ्लेवरची,आणि अनेक आकारांची चॉकलेटस् उपलब्ध आहेत… आपल्या प्रिय व्यक्तिची आवड लक्षात घेता तुम्ही नक्कीच तसे चॉकलेटस् देऊन त्यांना सरप्राईज देऊ शकता… तसे तर आपण चॉकलेट रोजच खातो पण आजच्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तिला चॉकलेट देण्याला विशेष महत्त्व असतं…चॉकलेट ही अशी गोष्ट आहे जी कोणत्याही गोष्टीवरचा रामबाण उपाय..म्हणजे आनंद शेअर करण्यासठी ,दुख: विसरण्यासाठी , राग ,रुसवे काढण्यासठी किंवा सहजही समोरच्या व्यक्तिच्या चेह-यावरील एका गोड स्माईलसाठी कोणत्याही प्रसंगासाठी चॉकलेट हे योग्यच ठरतं…त्यचा गोडवा कधीही न कमी होणारा आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button