breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

दिव्यांग व मुद्रा बँक कर्जदारांचे संमेलन व दिव्यांग अर्थसहाय्य योजना मेळावा*

पिंपरी –  सम्यक जनकल्याण प्रतिष्ठान आणि भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या वतीने दिव्यांग सशक्तीकरण शिबिराचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच युवकांना स्वयंरोजगाराची चालना मिळावी, याकरिता ‘मुद्रा कर्ज महामेळावा’ तर पालिकेकडून अपंगाना ‘अर्थसहाय्य योजना मेळाव्या’चेही चिंचवडच्या संभाजीनगर येथील साई उद्यान (शुक्रवार दि. 25) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लाडंगे, उपमहापाैर शैलेजा मोरे, नगरसेवक माऊली थोरात, विलास मडेेगिरी, केशव घोळवे, शहर प्रवक्ते अमोल थोरात, महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला मोळक, उमा खापरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याणकारी योजनेंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर भवनात पार पडलेल्या दिव्यांग सशक्तीकरण शिबिरामध्ये सुमारे 2100 लाभार्थीनी सहभाग नोंदवला होता.  या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या सहय्याने पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील गरजू दिव्यांग नागरिकांच्या अवयवांचे मोजमाप करण्यात आले होते. तसेच कर्णबधिर गरजूंना कोणत्या साहित्याची गरज आहे याची पूर्वनोंदनी करण्यात आली होती. या सर्व गरजूंना कानपूर फूट, कॅलिपर्स, तीनचाकी सायकल, तीनचाकी स्कुटर, व्हील चेअर, कुबड्या, सर्जिकल शूज, श्रवणयंत्र, अंधांसाठी काठी, ब्रेल किट, सीपी चेअर आदी साहित्यांचे वितरण येत्या 25 मे रोजी करण्यात येणार आहे.
तसेच या कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने ‘अर्थसहाय्य योजना मेळाव्या’चेही आयोजन करण्यात आले आहे. शहरातील तरुणांना स्वयंरोजगारास चालना मिळावी, त्यांना भांडवल उपलब्ध करून देणे, त्यांना उद्योजक होण्यास प्रेरणा मिळावी, याकरिता मुद्रा बँक महामेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात युवकांना मुद्रा बँक योजनेची सविस्तर माहिती देण्याबरोबरच कर्ज प्रकरणांची प्रक्रिया सांगण्यात येणार आहे. शहरातील जास्तीत जास्त युवकांनी व तरुण उद्योजकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अमर साबळे यांनी केले आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button