breaking-news

कारागृहात लॉकअपवर डोके आपटून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

औरंगाबाद | महाईन्यूज

न्यायालयाच्या आदेशाने जालना येथून हर्सूल मध्यवर्ती कारागृहात डांबलेल्या एका आरोपीने आरडाओरड करीत तेथील लॉकअपवर डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शुक्रवारी (दि.७) रात्री घडली. डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे पाहून उपचार करण्यासाठी आलेल्या नर्स आणि डॉक्टर, तुरुंगाधिकाऱ्यांना त्याने धमकावल्याचे समोर आले. याविषयी हर्सूल ठाण्यात कैद्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे.

चरणसिंग प्रेमसिंग सुलावने (रा. जालना) असे जखमी कैद्याचे नाव आहे. जालना पोलिसांनी एका गुन्ह्यात त्याला अटक केलेली होती. न्यायालयाच्या आदेशाने ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता त्याला हर्सूल कारागृहात आणण्यात आले. तेव्हापासून तो उद्धट वागत असून कारागृह पोलिसांना शिवीगाळ करीत धमकावत होता. हे पाहून कारागृह प्रशासनाने आरोपीला स्वतंत्र बॅरेकमध्ये ठेवले. ७.४५ वाजेच्या सुमारास त्याने छातीत दुखत असल्याची तक्रार तुरुंग रक्षकांकडे केली. नर्सिंग आर्डली भरत फड लगेच तेथे गेले आणि डॉक्टरांना बोलावून घेतो, असे सांगितले. त्यावेळी त्याने, मला आताच घाटीत पाठवा नाही तर मी माझ्या जिवाचे बरेवाईट करून घेतो, मी काय करू शकतो, तुम्हाला पाहायचे का? असे म्हणत त्याने स्वत:चे डोके तेथील लॉकअपवर जोरजोरात आदळून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. रक्तस्राव होत असल्याचे पाहून तुरुंगाधिकारी प्रशांत उखळे आणि अन्य रक्षकांनी त्यास पकडले. यानंतरही तो सर्वांना संपवून टाकीन, मला येथून बाहेर काढा, असे ओरडत होता. घाटीत उपचारासाठी त्याला पाठविल्यास तेथील सामान्य नागरिक आणि डॉक्टरांना तो त्रास देऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन कारागृह प्रशासनाने डॉक्टरांच्या निगराणीखाली तेथेच त्याच्यावर उपचार केले. याप्रक रणी तुरुंगाधिकारी उखळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुलावनेविरुद्ध हर्सूल ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न करणे, कारागृह पोलीस आणि डॉक्टरांच्या कामात अडथळा आणणे आदी कमलांनुसार गुन्हा नोंदविलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button