breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आजपासून सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह सुरू

मुंबई – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून सिनेमागृह बंद आहेत. आता अनलॉकच्या प्रक्रियेत चित्रिकरणाला परवानगी देण्यात आली असली तरीही सिनेमागृृहांना परवानगी देण्यात आली नव्हती. मात्र आता ५ नोव्हेंबरपासून म्हणजेच आजपासून राज्यातील सिनेमागृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स सुरू होणार आहेत. यासाठी ५० टक्के क्षमतेसह सरकारने परवानगी दिली आहे. तसेच केवळ प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील सिनेमागृह, नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्सना परवानगी देण्यात आली आहे.

तसेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोन वगळता तरण तलावही उघडण्यास संमती देण्यात आली आहे. राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मार्च महिन्याच्या मध्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सिनेमागृह, नाट्यगृह, शाळा सगळं बंद करण्यात आलं होतं. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक आस्थापनांना संमती देण्यात येत आहे.

सिनेमागृह, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह एकूण प्रेक्षक क्षमतेच्या ५० टक्के प्रेक्षकांसह आजपासून सुरू होणार आहेत. महाराष्ट्र सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचसोबत कोरोना प्रतिबंधित क्षेत्र अर्थात कंटेन्मेंट झोनच्या बाहेर असलेल्या योगा इन्स्टिट्यूट आणि इन डोअर स्पोर्ट्सनाही संमती देण्यात आली आहे.

दरम्यान, थिएटर सुरू करण्यात येणार असले तरी कोरोना संदर्भातले सुरक्षेचे सगळे नियम अर्थात SOP पाळणे बंधनकारक असणार आहे. कंटेन्मेंट झोन म्हणजेच कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर असणाऱ्या थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे उघडण्यास संमती देण्यात आली आहे. अनलॉक ५मध्ये ठाकरे सरकारने हॉटेल आणि रेस्तराँ ५० टक्के क्षमतेसह सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेली थिएटर्स, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे आजपासून उघडणार आहेत. त्यामुळे थिएटर मालक आणि कलाकार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button