breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आचारसंहितेनंतर स्थायी समितीची पहिलीच बैठक तहकूब

पिंपरी – लोकसभा निवडणूक आचारसंहिता शिथिल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची पहिलीच बैठक बुधवारी (दि.29) तहकूब करण्यात आली. गणसंख्येअभावी ही सभा तहकूह करावी लागली.

आचारसंहिता संपल्यानंतर ही पहिलीच बुधावारी नियोजित होती. परंतु, अधिका-यांची कमतरता असल्याने सुरुवातीला काही वेळासाठी ही बैठक तहकूब केली. परंतु, नंतर पुन्हा बैठक येत्या शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली. बैठकीला स्थायी समितीचे पुरसे सदस्य नसल्याने गणसंख्येअभावी ही सभा तहकूब करण्यात आल्याचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सांगितले. स्थायी समितीपुढे मोजकेच विषय असल्याने व अधिकारीही अनुपस्थित असल्याने ही सभा तहकूब करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button