breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शनिवारपासून जैन इतिहास परिषदेचे ११ वे अधिवेशन

पिंपरी – महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे ११ वे अधिवेशन पहिल्यांदाच पिंपरी-चिंचवडमध्ये थेरगाव येथील सोनाई मंगल कार्यालयात १ आणि २ जून या कालावधीत होत आहे, अशी माहिती परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा कटारिया यांनी दिली.

या अधिवेशनाचे उदघाटन शनिवारी (दि. १) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी कोल्हापूरते संस्कृत अध्यापक डॉ. नेमिनाथ रामा शास्त्री असणार आहेत. यावेळी महाराष्ट्र जैन इतिहास परिषदेचे संस्थापक श्रेणिक अन्नदाते, चंदुकाका सराफ अॅन्ड सन्सचे अतुल शहा, सोनिगिरा ज्वेलर्सचे दिलीप सोनिगरा, राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप घेवारे, राष्ट्रीय युवा महामंत्री अजित डुंगरवाल, प्रसार मंत्री नितीन चोपडा, डॉ. प्रिती नेमिनाथ शास्त्री आदी उपस्थित राहणार आहे.

सत्र पहिल्यात स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. अॅकॅडेमिक विश्वात जैन इतिहासाचा अभ्यास व महत्व यावर प्रा. रुपेश मडकर हे विचार मांडणार आहे. सत्र दुस-यात ग्रंथ प्रकाशन समारंभ होणार आहे. यावेळी साहित्यालंकार पुरस्कार प्रा. जवाहर शहा यांना अॅड. संतोष भोसे, विजयकुमार शांतीनाथ लुंगाडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तर विशेष पुरस्कारात निलम माणगावे, सुवालालजी शिंगवी, रेखा बैजल, प्रा. सुरेखा कटारिया, लीलावती जैनस विजयकुमार लुंगाडे, अंजली शहा, हर्षल डोणगावकर, तनिषा चोपडा यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर शोधनिबंध वाचन, महापुराण एक मौलिक वारसा यावर प्रतिमा शहा यांचे व्याख्यान होणार आहे.

रविवारी मंगलाचरण, आचार्य परंपरेचे सातत्य आणि व्यापकता याविषयावक जैन गुरुकुलचे विश्वस्त राजाभाऊ डोणगावकर यांचे व्याख्यान होणार आहे. तर,  दुपारी चार वाजता अधिवेशनाचा समारोप होणार आहे. त्यामध्ये विश्वकर्मा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सिध्दार्थ जबडे, त्रिपुरा विद्यापीठाचे डॉ. विजयकुमार धारुरकर आदी उपस्थित राहणार आहे.  प्रा. सुरेखा कटारिया, विजयकुमार लंगाडे, अंजली शहा, हर्षल डोणगावकर, प्रकाश कटारिया, विजयकमार अन्नदाते, प्रदीप फलटणे, डॉ. सुजाता बरगाले, निर्मला ढोले, साधना सवाने, संगीता मंगुडकर, अनघा गांधी, रेखा छाबडा, सुजाता नवले हे अधिवेशनाचे संयोजक आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button