breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

आग्रीपाडा परिसरातील इमारतीच्या लिफ्टमध्ये अडकून २ वॉचमनचा मृत्यू

मुंबई – आग्रीपाडा परिसरात काल मुसळधार पावसामुळे एका इमारतीच्या तळघरात पाणी शिरून लिफ्ट बंद पडल्याने या लिफ्टमध्ये अडकून दोन वॉचमनचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

जमीर अहमद सोहानन (३२) आणि शहजाद मोहम्मद सिद्दिकी मेमन (३७) असे मृत्यूमुखी पडलेल्या दोन वॉचमनची नावे आहेत. यातील मेमन हा डोंगरी परिसरात कुटुंबासह राहत होता, तर सोहनन हा काम करत असलेल्या त्याच इमारतीच्या सोसायटी केबिनमध्ये राहत होता. हे दोघे काला पानी जंक्शन जवळच्या नाथानी इमारतीत वॉचमनचे काम करत होते.

मुंबईत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे या इमारतीच्या तळघरात पाणी शिरू लागले होते. त्यामुळे काल बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास हे दोघेजण तळमजल्यातील पाणीपुरवठा यंत्रणेची पाहणी करण्यासाठी गेले होते. ते काम आटोपून दोघेही वर येण्यासाठी लिफ्टमध्ये शिरले. नंतर लिफ्टचा दरवाजा बंद झाला पण लिफ्ट काही सुरू झाली नाही. लिफ्टवर जस नसल्याने त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण दरवाजाही घट्ट झाला होता. तो उघडत नव्हता. त्यामुळे शेवटी त्यांनी अलार्म वाजवून तिथल्या रहिवाशांना मदतीसाठी बोलावले. त्यानंतर इमारतीतील काही लोक छातीपर्यंत पाणी साचलेल्या तळघरात कसेबसे लिफ्टपर्यंत पोहचले आणि त्यांनी लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचेही प्रयत्न व्यर्थ ठरले. त्यामुळे इमारतीमधल्या काही लोकांनी अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी पोहचले. त्यांनी तेथील परिस्थिती पाहून लिफ्टच्या वरचा भाग कापून या दोघांना वर खेचून बाहेर काढले आणि त्वरित नायर रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी यासंदर्भात आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button