breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल धनंजय मुंडेंविरोधात गु्न्हा

बीड – प्रचाराचा धुमाकूळ शमल्यानंतर परळी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे आणि भाजपच्या उमेदवार आणि विद्यमान मंत्री पंकजा मुंडे यांच्यातील वाद पेटला आहे. प्रचारादम्यान पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरला झाला आहे. यासंदर्भात जुगल किशोर लोहियांच्या तक्रारीनंतर परळी शहर पोलिसांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात कलम ५०९ आणि कलम ५९४ गुन्हा दाखल केला आहे.

परळी येथील सभेनंतर पंकजा मुंडे यांना भोवळ आल्याचे पाहायला मिळाले होते. धनंजय मुंडे यांनी प्रचारसभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याची चर्चा बीड जिल्ह्यात रंगली होती. सुरज धस यांनी याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले होते. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पंकजा मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी परळी शहर पोलिसांत ठिय्या मांडला होता.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली आहे. शनिवारी माझ्या वक्तव्याबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेली ती क्लिप एडिट करून, वक्तव्याचा विपर्यास करणारी आणि जाणीवपूर्वक माझी बदनामी करणारी आहे. ती क्लिप पूर्णपणे चुकीची असून त्याची सत्यता फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासावी, असे धनंजय मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button