breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘आई माझी काळूबाई’ मध्ये अलका कुबल दिसणार देवी काळूबाईच्या रुपात

‘धुरळा’ या चित्रपटात दमदार भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री अलका कुबल एका मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकेचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून त्यामध्ये अलका कुबल देवी काळूबाईच्या रुपात दिसत आहेत. ‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ असं लिहित अलका यांनी हा टीझर इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सोनी मराठी वाहिनीवर ही मालिका लवकरच सुरू होणार आहे.

‘आई माझी काळूबाई’ असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेचं कथानक आणि त्यातील इतर भूमिका यांविषयी अद्याप निर्मात्यांनी कोणतीही माहिती जाहीर केलेली नाही. मात्र टीझरमधील अलका कुबल यांचा लूक पाहून प्रेक्षकांमध्ये मालिकेविषयी फार उत्सुकता निर्माण झाली आहे.

अलका यांनी याआधीही पौराणिक कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेलाही प्रेक्षक डोक्यावर उचलून घेतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button