breaking-newsराष्ट्रिय

मोदींच्या कट्टर विरोधकाला भाजपात महत्त्वाची जबाबदारी

एकेकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे टीकाकार म्हणून ओळखले जाणारे गोवर्धन झडपिया यांनी राष्ट्रीय राजकारणात जोरदार पुनरागमन केले आहे. गोवर्धन झडपिया गुजरातमधील वजनदार नेते असून भाजपाने त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवली आहे. २०१९ मध्ये केंद्रात पुन्हा सरकार बनवण्यासाठी उत्तर प्रदेशची लढाई जिंकणे भाजपासाठी अत्यंत महत्वाचे आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे.

गोवर्धन झडपिया यांनी २०१४ मध्ये भाजपात पूर्नप्रवेश केला. त्याआधी त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूकही लढवली होती. एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी १७ राज्य प्रभारींची नियुक्ती जाहीर केली. त्यामध्ये झडपिया यांचे नाव आहे. २००२ मध्ये गुजरात दंगलीच्यावेळी गोवर्धन झडपिया गुजरात सरकारमध्ये गृहराज्यमंत्री होते.

दंगलीच्यावेळी हिंसाचार रोखण्यासाठी योग्य पावले उचलली नाहीत असा त्यांच्यावर आरोप झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदींनी गोवर्धन झडपिया यांना मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर त्यांनी जाहीरपणे मोदींवर टीका करण्यास सुरुवात केली होती.
२००७ साली त्यांनी स्वत:चा पक्ष बनवला व भाजपा विरोधात निवडणूक लढवली. त्यानंतर झडपिया यांनी नरेंद्र मोदींचे कडवे टीकाकार केशुभाई पटेल यांच्याशी हातमिळवणी केली. प्रविण तोगडिया यांची विश्व हिंदू परिषदेतून एक्झिट झाल्यानंतर गोवर्धन झडपिया यांनी पक्षनेतृत्वाची मर्जी संपादन केली.

गुजरातमध्ये हार्दिक पटेलला उभे करण्यामागे झडपिया असल्याचे बोलले जाते. विश्व हिंदू परिषदेमध्ये असताना प्रवीण तोगाडियांचे निकटवर्तीय अशी त्यांची ओळख होती. गोवर्धन झडपिया यांच्यासह दृश्यंत गौतम आणि नरोत्तम मिश्रा यांचीही उत्तर प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button