breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रस्त्यावर फिरणा-या करोनाग्रस्तांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी 300 जणांची ‘रॅपिड रेस्क्‍यू टीम’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

करोना विषाणूने बाधित रुग्णांची पिंपरी-चिंचवड शहरामधील संख्या नऊ झाली आहे. परदेशातून शहरात आलेल्या 161 जणांना होम क्वांरटाईन (स्वतःच्या घरात बंदिस्त) करण्यात आले आहे. त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने 300 जणांचे पथक तयार करण्यात येणार आहे. या पथकाच्या माध्यमातून होम क्वांरटाईन केलेल्या नागरिकांवर नजर ठेवण्यात येणार आहे.

उपाचार घेत असलेल्या नऊ “करोना’बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. तसेच परदेशातून आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसत नाहीत, त्यांना घरीच “होम क्वांरटाईन’ केले जात आहे. त्यांना चौदा दिवस स्वतःच्याच घरामध्ये राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र ते रुग्ण घरीच थांबतात का, यावर नजर ठेवण्यासाठी 300 जणांची “रॅपिड रेस्क्‍यू टीम’ तयार करण्यात येणार आहे. त्यामध्ये चार-चार जणांचे पथक असणार आहे. हे पथक संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन देखरेख करणार आहे. हे काम करत असताना पथकातील कर्मचारी कुणाला कळू नये, अशा प्रकारे साध्या वेषामध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. त्याचप्रमाणे संबंधित भागातील सीसीटीव्ही फुटेजही तपासणार आहेत. त्यामध्ये होम क्वांरटाईन केलेला नागरिक फिरताना आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

“होम क्वांरटाईन’ केलेल्या नागरिकांच्या घराचे पत्ते, मोबाइल नंबर या पथकाकडे देण्यात येणार आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी चौदा दिवस घरामध्येच राहावे, यासाठी हा उपाय महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. या पथकांना त्याचे रिपोर्टिंग क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या दवाखान्यामध्ये करायचे आहे.

बाधित रुग्णांच्या घराभोवती सर्वेक्षण, फवारणी

पिंपरी-चिंचवडमधील ज्या भागामध्ये करोना बाधित रुग्ण आढळला आहे. त्या भागातील घरांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे. तेथील नागरिकांमध्ये काही लक्षणे दिसताच त्यांची तपासणी केली जात आहे. ज्यांना साधा सर्दी, खोकला आहे त्यांनाही “होम क्वांरटाईन’ केले जात आहे. तसेच त्या भागात संपूर्ण परिसराची फवारणी केली जात आहे. एखाद्या सोसायटीमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण आढळला तर त्या संपूर्ण इमारतीची फवारणी केली जाते. गेल्या चार दिवसांमध्ये 20 हजार घरांची फवारणी करण्यात आली आहे. तसेच पोलीस आयुक्तालय, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, क्षेत्रीय कार्यालये, महापालिका भवन या ठिकाणीही फवारणी करण्यात आली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button