breaking-newsपुणे
पुणे-दरभंगाला अतिरिक्त कोच
पुणे – प्रवाशांची गर्दी लक्षात घेता दरभंगा-पुणे-दरभंगा एक्स्प्रसेला तात्पूरत्या स्वरुपात दोन अतिरिक्त कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरभंगा स्थानकातून 25 ते 29 जूनदरम्यान तर पुणे स्थानकातून 30 मे ते 4 जुलैदरम्यान ही सुविधा उपलब्ध राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
एक वातानुकूलीत थ्री टियर, एक टू टियर कोच जोडले जाणार आहेत. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.