breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पवनाथडी जत्रा सांगवीत घेतल्यास तीव्र आंदोलन करू

– महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या सीमा बेलापुरकर यांचा इशारा

पिंपरी | प्रतिनिधी

इतर सर्व बचतगटातील महिलांचा विचार करता पवनाथड़ी जत्रा शहराच्या मध्यभागी घ्यावी. जेणेकरून शहरातील सर्व महिला बचतगटांना त्याचा लाभ होईल, मागणी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने करण्यात आली. मात्र पुन्हा पवनाथड़ी जत्रा सांगवीत झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पिंपरी चिंचवड शहर सचिव सीमा बेलापुरकर यांनी निवेदनद्वारे दिला.

निवेदनात नमुद करण्यात आले की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विभागामार्फत महिला बाल कल्याण अंतर्गत महापालिका हद्दीत महापालिकेने पवनाथडीचे नियोजन केले आहे. या मधे महिला बचतगटांनी बनविलेल्या वस्तु विक्री करण्यासाठी व त्यांचे कला कौशल्य दाखविण्यासाठी याचे आयोजन केले जाते. गेल्या काही वर्षापासून ही जत्रा शहराच्या मध्यभागी न होता काही वर्षापासून सांगवितच घेतली जात आहे. त्याचे मुख्य कारण अद्यापही समजत नाही. महिला बचतगटासाठी ही योजना राबवली जात असेल तर सोयीची ठिकाणे निवडणे गरजेचे आहे. सांगवीत पवनाथड़ी घेतल्याने निगडी, चरोली, चिखली, जाधववाडी, भोसरी, पिंपरी, वल्लभनगर, नेहरूनगर अशा अनेक ठिकाणच्या बचतगटातील महिलांना त्यामधे सहभागी करुन घेता येत नाही.

पवनाथडीत कोणतेही राजकारण करू नये. मात्र पुन्हा पवनाथड़ी जत्रा सांगवीत झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पिंपरी चिंचवड शहर सचिव सीमा बेलापुरकर यांनी निवेदनद्वारे दिला.

निवेदनावर अश्विनी बांगर, स्नेहल बांगर, अनिता पांचाळ, दक्षता क्षीरसागर आदींच्या सहया आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button