breaking-newsराष्ट्रिय

‘असा बालगंधर्व’ वाचकांच्या भेटीला येणार हिंदीमध्ये

नवी दिल्ली – ‘असा बालगंधर्व’ या कादंबरीच्या ‘बालगंधर्व’ या हिंदी अनुवादित पुस्तकाचे १६ जुलै रोजी मंडीहाऊस येथील रविंद्र भवनात प्रकाशन होणार आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार विजेते नाट्य-पटकथालेखक, दिग्दर्शक अभिराम भडकमकर यांनी ‘असा बालगंधर्व’ ही कांदबरी लिहिली आहे.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पद्मश्री कीर्ती शिलेदार यांच्या हस्ते ‘बालगंधर्व’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री रामगोपाल बजाज तर भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. तर, ज्येष्ठ अभिनेते व लेखक आणि नॅशनल मिशन फॉर कल्चरल मॅपिंगचे अध्यक्ष दीपक करंजीकर हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button