breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अश्विनी भिडे यांची ‘मेट्रो’तून बदली

मुंबई | महाईन्यूज

सत्तांतरानंतर प्रशासनात मोठय़ा प्रमाणात फेरबदल करीत गेल्याच आठवडय़ात दोन डझनहून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी आणखी २० अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिलेले आहेत.

आरे कारशेडसाठीच्या वृक्षतोडीवरून शिवसेनेची नाराजी ओढवून घेतलेल्या अश्विनी भिडे यांना मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून हटविण्यात आले. मात्र, त्यांची अन्यत्र नियुक्ती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरीकडे, कर्तव्यकठोर आणि धडाडीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिका आयुक्तपदी बदली करीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचक इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पुणे महापालिका आयुक्तपदी शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button