breaking-newsपुणे

‘अविष्कार’ स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपविजेते

पुणे |महाईन्यूज|

महाराष्ट्र आंतरविद्यापीठ अविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्वसाधारण उपविजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत मुंबई विद्यापीठ सलग तिसऱ्यांदा विजेते ठरले. मुंबईत झालेल्या या स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ४८ जणांचे प्रकल्प सादर करण्यात आले होते. त्यापैकी पाच प्रकल्पांना पुरस्कार मिळाले.

मानवविज्ञान, भाषा व ललित कला विद्याशाखेतील शिक्षक स्तरावर आशा ठोके यांना प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. वैद्यकशास्त्र व औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेतील पदव्युत्तर पदवी स्तरावर अजिंक्य पोटे अभिजित कोरे यांना दुसरा क्रमांक मिळाला. कृषी व औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेतील पदवी स्तरावर सागर ठाकरे याच्या प्रकल्पाने प्रथम क्रमांक पटकावला. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखेतील शिक्षकस्तरावरील दुसरा क्रमांक संजय मतेकर यांना मिळाला. या पुरस्कारांसह विद्यापीठाने पाचव्यांदा उपविजेतेपद मिळविले. आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नऊ वेळा विजेतेपद पटकावले आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button