breaking-newsपुणे

अलंकापुरीत रंगला श्रींचा वैभवी रथोत्सव

आळंदी : वीणा, टाळ, मृदंगाच्या त्रिनादासह माऊली माऊली… श्री विठ्ठल श्री विठ्ठल, ज्ञानोबा माऊली तुकाराम अशा नामगजरासह जयघोष करीत रविवारी (दि. २४) हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत द्वादशी दिनी माऊलींचा वैभवी चांदीचा मुखवटा रथोत्सवात पूजा बांधत रथोत्सव हरिनाम गजरात प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा झाला. रथोत्सव मिरवणुकीदरम्यान ग्रामप्रदक्षिणेसाठी पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाचा नामजयघोष झाल्यानंतर उपस्थित भाविकांचे हात श्रींचे रथोत्सवातील रथ ओढण्यास सरसावले. उद्या सोमवारी (दि. २५) आळंदीत श्रींचा ७२४ वा संजीवन समाधी सोहळा होत आहे.


 ज्ञानभक्ती चैतन्यमयी वातावरण रथोत्सवात ग्रामप्रदक्षिणा मिरवणुकीने नगरप्रदक्षिणा कार्तिकी वारीत झाली. यावेळी रस्त्यांचे दुतर्फा उभे राहून श्रींचे दर्शन घेत भाविकांनी रथ हाताने ओढत आपली सेवा रुजू केली. तत्पूर्वी श्रींची पालखी मंदिरातून खांद्यावर घेत रथोत्सवास गोपाळपुरात परंपरेने नामगजरात आणण्यात आली.


 द्वादशी दिनी रविवारी दुपारी श्रींच्या महानैवेद्यास भाविकांना दर्शन काही वेळ बंद ठेवण्यात आले होते. श्रींचा महानैवेद्य झाल्यानंतर भाविकांना दर्शन पुन्हा सुरू झाले. तत्पूर्वी मंदिरात श्रींना पहाटे पवमान अभिषेक, दुधारती झाली. परंपरेने खेडचे प्रांत संजय तेली यांचे हस्ते पंचोपचार पूजा झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, तहसीलदार सुचित्रा आमले, मंडलाधिकारी चेतन चासकर, मुख्याधिकारी समीर भूमकर आदी उपस्थित होते. द्वादशीला श्रींचा रथोत्सवास जाण्यास मंदिरातून श्रींची पालखी चांदीचा वैभवी मुखवटा फुलांनी सजलेल्या चांदीचे पालखीत पूजा बांधत विराजमान करण्यात आला. श्रींची पालखी खांद्यावर घेत महाद्वारातून शनिमंदिरमार्गे गोपाळपुरातील श्री राधाकृष्ण मंदिरात आली. श्रीकृष्ण मंदिरात परंपरेने इनामदार कुटुंबीयांच्या वतीने श्रींची विधिवत पूजा झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button