breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

धक्कादायक! पाकिस्तान मोठया हल्ल्याच्या तयारीत? POK मधील लाँच पॅडसवर ४५० दहशतवादी

जगातील अन्य देशांप्रमाणे पाकिस्तानही करोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहे. पण या परिस्थितीतही पाकिस्तान सुधारलेला नाही. दहशतवादाला खतपाणी घालण्याचे त्यांचे उद्योग सुरुच आहेत. काश्मीरमधील १४ लाँच पॅडसवर मोठया संख्येने दहशतवादी थांबले आहेत. हे सर्व दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहेत. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या हवाल्याने हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

“पाकिस्तानतील विविध दहशतवादी संघटनांशी संबंधित असलेले ४५० दहशतवादी या लाँच पॅडसवर असल्याची आमची माहिती आहे” असे या अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानने लाँच पॅडसवर दहशतवाद्यांची संख्या दुप्पट केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. इतक्या मोठया संख्येने दहशतवादी लाँच पॅडसमध्ये असल्याने पाकिस्तानकडून एखादा मोठा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अलीकडेच गुप्तचर यंत्रणांनी लाँच पॅडसवर २३० च्या आसपास दहशतवादी असल्याची माहिती दिली होती. हिंदुस्थान टाइम्सने नऊ एप्रिलला हे वृत्त दिले होते. ‘मागच्या दोन ते तीन आठवडयात चित्र बदलले आहे’ असे या अधिकाऱ्याने सांगितले. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यांकडे असलेल्या माहितीनुसार, ४५० दहशतवाद्यांपैकी २४४ लष्कर-ए-तोयबा, १२९ जैश-ए-मोहम्मद आणि ६० हिजबुल मुजाहिद्दीनचे दहशतवादी आहेत. अल बदर सारख्या छोटया दहशतवादी गटांचेही अतिरेकी इथे आहेत. पाकिस्तानात चालणाऱ्या दहशतवादी कॅम्पसमधून हे अतिरेकी लाँच पॅडसवर पोहोचले आहेत. १६ दहशतवादी कॅम्पसपैकी ११ पाकव्याप्त काश्मीरमध्ये, दोन पंजाब आणि तीन खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button